पारडी येथे वादळी पावसामुळे घराचे छत उडाले - इलेक्ट्रिक पोल तुटल्यामुळे वीज गायब

 


सावली - तालुक्यातील पारडी येथे गुरुवारी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांच्या छतावरील टिन उडाले, मुख्य चौकातील मंदिराचे समोरील छत उडाला व विजेच्या तारांवर झोड कोसल्यामुळे ६ पोल तुटले असून सायंकाळपासून वीज बंद आहे. याबाबतची माहिती महसूल विभागाला देण्यात आली असून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र वृत्त लिहीपर्यंत नुकसानीचे पंचनामे झालेले नसल्यामुळे प्रशासनाविरुद्ध संतापही व्यक्त होत आहे. उकाड्यात वीज नसल्यामुळे गावकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!