विजेच्या धक्क्याने गाईचा मृत्यू

शेतकऱ्यावर आणखी एक संकट

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बु एम एस ई बी अंतर्गत येत असलेल्या चारगाव खुर्द या गावच्या स्मशानभूमीच्या रोडवर असलेल्या विद्युत खांबाजवळ चारगाव खुर्द येथील शेतकरी देविदास ताडाम यांची गाय पाणी पिण्यासाठी गेली असता खांबाला आधार देण्यासाठी असलेल्या ताराला विद्युत प्रवाह असल्याकारणाने गायीचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकऱ्याला एम एस ई बी च्या गलथान कारभारामुळे आणखीन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवल असुन महावितरण ने पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी गावातील नागरिकाकडुन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!