विजेच्या धक्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू - पेंढरी येथील धक्कादायक घटना

 

सावली - आपल्या शेतात धानाच्या पिकास पाणी देण्यासाठी मोटरपम्प सुरु करायला गेलेल्या शेतकरी युवकाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना पेंढरी शेतशिवारात घडली.

      तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवा शेतकरी रोहीत रविंद्र ढोले (वय २८ वर्ष) हे उन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी शेतात गेले. मोटरपम्प सुरु करण्यासाठी स्विच ऑन करायला गेले मात्र केबल खराब असल्याने विजेचा धक्का लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा आला नाही म्हणून वडील शेतात गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पाथरी पोलिसांनी मर्ग दाखल करून शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. रोहितच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!