आनंद माध्यमिक विद्यालय , आनंदवन चा निकाल उत्कृष्ट ९३.७५ टक्के निकाल
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - महारोगी सेवा समिती वरोरा संचालित आनंद माध्यमिक विद्यालय,आनंदवन चा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९३.७५ टक्के लागला आहे.
विद्यालयातून ८५ .४० टक्के घेऊन श्रध्दा गुरुदास वदनलवार प्रथम आली.तर स्वरूप सुनील बंडे ८०.८० टक्के घेऊन दुसरा,सोनल अजय गुळगुंडे ८०.६०टक्के घेऊन तिसरी,संकेत संजय देसाई ८०.२० टक्के घेऊन चवथा,शर्वरी मोरेश्वर नक्षिणे ८०.०० टक्के घेऊन पाचवी आली.
महारोगी सेवा समिती वरोरा संचालित आनंद माध्यमिक विद्यालयाची श्रद्धेय बाबा आमटे यांचे प्रेरणेने म.से.स चे सचिव समाजसेवक डॉ.विकास आमटे यांनी सन २०१८ ला मुहूर्तमेढ रोवली.आनंदवन परिसरातील गावखेड्यातील गोरगरिबांची मुले शिकावी यासाठी इयत्ता नववी पासून सुरुवात केली.पहिल्या वर्षाला फक्त १३ मुले शिक्षण प्रवासात होती.तज्ञ शिक्षकांच्या शिकवणीमुळे शाळेची व विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली.आज इयत्ता नववी व दहावी ह्या दोन वर्गामध्ये १०० विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात.शाळा स्वयंअर्थसहाय्यित असून महारोगी सेवा समिती वरोरा ,शाळा व विद्यार्थ्यांना पूर्ण सुविधा पुरवितात. विद्यार्थ्यांचा अधिक बुद्ध्यांक वाढावा यासाठी विषयानव्ये शिक्षक जादा वर्ग घेतात.शिक्षणप्रवासात विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडावे हाच मूळ उद्देश मुळाशी धरून आनंद माध्यमिक विद्यालय नावाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले.याच शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी सैन्य दल, पोलीस,नर्सिंग अशा विविध क्षेत्रात आपले कर्तव्य पार पाडत आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे (टोंगे) यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद शालेय उपक्रम,खेळाचे प्रात्यक्षिके, स्वच्छता अभियान, रात्रीचा अभ्यासवर्ग आदी उपक्रम राबवितात.शाळा आनंदवन परिसर तथा वरोरा शहरात ढ विद्यार्थ्यांना हुशार करणारी व गोरगरिबांच्या मुलांच्या हिताची शाळा म्हणून नावारूपास आली आहे.मुलांना घडविण्याकडे विशेष कल असणाऱ्या शाळेकडे आज पालक व पाल्य आकर्षित होताना दिसून येत आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.विकास आमटे,उपाध्यक्ष सुधाकर कडू,कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, शा व्य समितीचे सदस्य डॉ.विजय पोळ,कोषाध्यक्षा सारिका सावसाकडे, सदस्य सदाशिवराव ताजने, दिपक शिव,रवी नलगिंटवार , या सर्व व्यक्तिमत्वाचे प्रेरणादायी मार्गदर्शन शिक्षक व विद्यार्थ्यांना मिळत असते.दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांचे घरी जाऊन शिक्षकांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी व महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे,विश्वस्त सुधाकर कडू,कौस्तुभ आमटे,पल्लवी आमटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!