लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती नेरी येथे उत्साहात साजरी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती नेरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी किशोर उकुंडे शिवसेना कार्यकर्ता,ग्रामपंचायत सदस्य तथा अध्यक्ष अण्णाभाऊ साठे समिती नेरी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास विलासभाऊ डांगे शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व तानाजी सहारे शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा उपसरपंच ग्राम पंचायत बोथली यांचे हस्ते पूजा करून ध्वजारोहन पार पडले. त्यानंतर किशोर उकुंडे यांनी प्रास्ताविक केले. नंतर तानाजी सहारे व विलासभाऊ डांगे यांनी महापुरुष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले कार्य सांगताना समाजाने शिक्षणाचे धडे घ्यावेत व विविध क्षेत्रात महत्वपूर्ण स्थान मिळवून समाजाचे प्रगती साठी कार्य करावे तसेच शासनाचे माध्यमातून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे मत आपले मनोगतातून मत मांडले. शेवटी आलूभात वाटप व केक कापून आनंदमय वातावरणात जन्म ऊत्सव साजरा केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!