साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागामध्ये वाढ....
साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागामध्ये वाढ....
वरोरा....जगदीश पेंदाम
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारामध्ये ग्रामीण भागामध्ये वाढ झालेली असून डेंगू , मलेरिया, कावीळ रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..
ग्रामीण भागातील जनतेला उपचार करीता जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जावे लागत असून आरोग्य उपचार करीता आजही ग्रामीण भागात पुरेपूर शासनाच्या सुविधा नाही आहे, सगळीकडे शेतीच्या हंगाम सुरू असून पैशा अभावी ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर, शालेय विद्यार्थी, गरोदर माता, इतर नागरिक उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपयोग करत असतात ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात ताप, हातपाय, डोके दुखणे,सर्दी,खोकला यांचे प्रमाण वाढले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना योग्य औषधी व उपचार मिळत आहे, परंतु रक्त तपासणीचे रिपोर्ट तात्काळ उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना खाजगी महाग रक्त तपासणी पॅथॉलॉजी कडे तीनशे ते पाचशे रुपये खर्च करून रक्त तपासणी करून घ्यावे लागत असुन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, खेड्यापाड्यात घरोघरी विविध प्रकारच्या आंंजाराने जोर पकडलेला असून संसर्गजन्य आजारावर वेळीच आळा घालण्याचा दृष्टीने शासकीय आरोग्य यंत्रणा कमी पडत नाही ना असा प्रश्न जनतेच्या मनात उद्भवत असून आजही ग्रामीण परिसरात जनतेच्या भोळ्या पणाचा फायदा घेत बोगस डॉक्टरांनी शिरकाव करून ग्रामीण भागात उपचार करतांना दिसत आहे...
तालुक्यातील विविध बाहेरील मेडिकल, खाजगी रुग्णालयकडे सामान्य जनतेला उपचाराकरीता धाव घ्यावे लागत आहे.
जवळपास असलेल्या आरोग्य केंद्रात शेतकरी,शेतमजूर,विद्यार्थी लहान मुले, महिला प्राथमिक आरोग्य केंद्रातील येत असुन ओ पी डी मध्ये शंभरच्या वर रुग्ण येत असुन विविध आजाराची रुग्ण मिळत आहे...
तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने गावात,वार्डात फवारणी करून या आजारावर अंकुश लावावा अशी मागणी परिसरातील ग्रामीण जनतेकडून करण्यात येत आहे..
पावसाळ्यात डास, माशांचे प्रमाण वाढत असून माशी अन्नावर बसत असतात तेव्हा अण्णातुनही विविध रोग पसरत असतात त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे पावसाळ्यातील ओल्यावामुळे विषाणू तसेच जिवाणू ही वाढत असतात त्यामुळे घराभोवती परिसर स्वच्छ ठेवावे, पिण्याचे पाणी उकळून प्यावे, उघड्यावरील तेल पदार्थ तसेच शीळे अन्न खाऊ नये, थंडी,ताप,खोकला अतिसार झाल्यास लवकर डॉक्टरांना दाखवावे.. तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!