वन मोहत्सव नुक्कड नाटक " एक पेड माँ के नाम


 
वन मोहत्सव नुक्कड नाटक " एक पेड माँ के नाम


आज दिनांक  15/07/2025 ला माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स च्या वतीने दिशा फाउंडेशन चे अध्यक श्री भाऊराव झाडें यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं येथील गजबजीचे ठिकाण असलेल्या गांधी चौकात वनमोहत्सवाच्या नॉमित्ताने एक पेड माँ के नाम आधारित नुकडं नाटक करण्यात आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान शाळेच्या प्राचार्या कु. रीमा कांबळे मॅडम यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्री. विजय आर. राठोड सर, वाहतूक निरीक्षक श्री. बन्सीलाल कुडावले सर, कर्मवीर महाविद्यालयाचे प्रोफेसर श्री. आगलावे सर, भाजपा शहर अध्यक्ष श्री. प्रवीण एन. मोहुर्ले सर यांनी आपली उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमांची सुरवात मान्यवरांचे स्वागत पुष्पगुछ व *"माँ के नाम एक पेड"* देऊन करण्यात आले. शाळेच्या विध्यार्थ्यानी सुंदर असे जनजागृतीपर नुक्कड नाटक लोकांसमोर सादर केले. कार्यक्रमाचा हेतू लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करणे असा होता. मान्यवरांनी आपल्या भाषणातून लोक्काना झाडांचे महत्व पटवून दिले. कार्क्रमच्या यशस्वीतेस उप प्राचार्य श्री. अस्पाक सय्यद, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख श्री. दुष्यंत एम. गणवीर सर यांचे योगदान लाभले. कार्क्रमाचे संचलन सहाय्यक शिक्षक श्री. वामन कवाडकर सर व श्री. भूपेंद्र मोटघरे सर यांनी केले, तसेच सहाय्यक शिक्षिका प्रीती यामवार मॅडम व चैताली बावणे  मॅडम सर्व शिक्षक वृंद, ड्राइवर, कंडक्टर, इतर शिक्षकेतर कर्मचारी श्री. नानाजी गजभिये व वैभव चाटे यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाला लोक्कानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व तोंडभरून कौतुक केले. कार्क्रमांची सांगता शहरातून वृक्षदिंडी  काढून करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!