व्याहाड खुर्दच्या स्मशानभूमीत वाघाचा वावर - झुडपे तोडून उपाययोजना करण्याची आशिष पुण्यपवार यांची मागणी
सावली - व्याहाड खुर्द-केरोडा रस्त्यावरील गावाला लागूनच असलेल्या स्मशानभूमी परीसरातील नर्सरीचे रुपांतर मोठ्या झुडुपात झाल्याने संपूर्ण स्मशानभूमीत झुडपाचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे या ठिकाणी वाघाचे वास्तव्य सुरु झाल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुर्वी व्याहाड खुर्द ग्राम पंचायत मार्फतीने काही विशिष्ट प्रकारची झाडे लावून एक नर्सरी तयार करण्यात आली, परंतु सदरची नर्सरी आता एका घनदाट झुडुपात रूपांतरित झालेली आहे, याठिकाणी आता वन्य प्राण्यांंनी वास्तव्यासाठी बस्तान मांडले आहे, त्यामुळे नागरिकांना त्याचा धोका होण्याची शक्यता अधिक आहे, याच परिसरात गावातील जनावरांसाठी असलेले आखर व स्म्शान भूमी असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणा-या नागरीकांना झुडुपात मध्ये उभं राहावे लागत आहे.स्मशान भुमिच्या शेडला झुडपांनी वेढलेला असल्याने प्रेत जाळण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमी आजूबाजूला लागुन गावकऱ्यांची शेती अश्यातच या ठिकाणी वाघाचे वास्तव्य आढळून आले.काही जीवित हानी टाळण्यासाठी यासाठी नर्सरीतील अनावश्यक झुडपे तोडणी करणे गरजेचे आहे. सदरच्या नर्सरीमध्ये परस या झाडांची संख्या खूपच अधिक आहे ती छाटणी केल्यास ग्राम पंचायती मार्फतीने लावलेल्या नर्सरी वाढीसाठी मदत ठरु शकेल आणि वन्य प्राण्यांचे वास्तव्यपण राहणार नाही.या साठी वन विभागानेही लक्ष घालणे आवश्यक आहे.मात्र अंत्ययात्रेला येणाऱ्या नागरीकांना होणारा त्रास टाळण्यासाठी स्धानीक ग्राम पंचायतीने अधीक लक्ष देण्याची मागणी व्याहाड खुर्द येथील व्याहाड खुर्द येथील युवा स्वराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष पुण्यपवार यांनी केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!