शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवीन मुलीवर सामूहिक अत्याचार....

शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवीन मुलीवर सामूहिक अत्याचार....

३ आरोपी ताब्यात, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल...

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दंगा नियंत्रण पथक शेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल...


वरोरा.... जगदीश पेंदाम

शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघळकीस आली असुन एक अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून त्याची विडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल केल्याची  घटना उघळकीस आली आहे..

आज दि. ११ जुलै २०२५ ला दुपारी २ च्या दरम्यान पीडित मुलगी तिच्या वाडीला सोबत येऊन तक्रार दाखल केल्या नंतर ही घटना उघडकीस आली आहे. ही घटना पीडितेच्या सांगण्यावरून २४ मे रोजी घडली असून याचा विडिओ बनवून आरोपीने सोशल मीडियावर वायरलं केल्या नंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. दरम्यान शेगाव पोलीस यांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तात्काळ सूत्र हलवत ३ आरोपीना अटक केली असून त्यातील आरोपी १) स्वप्नील राजकुमार गुर्जनवार २) गणेश राजेंद्र विश्रामकर दोन्ही आरोपी राहणार पवनगावं (करूर ) ता. समुद्रपूर जिल्हा वर्धा व ३) रोहन गजानन विश्रामकर रा. चंद्रपूर अशी तिन्ही आरोपीचे नाव असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. व आरोपीवर कलम ७०(२), १२३, भारतीय न्याय संहिता -२०२३ सहकलम ४, ६ पोस्को कायदा, सहकलम ६६ (ई), ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कुठलीही  घटना घडू नये या साठी चंद्रपूर दंगा नियंत्रण पथक यांना पाचारण केले होते. तसेच भद्रावती, वरोरा, चिमूर, भिसी येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर फॉरेन्सि टीम सुद्धा दाखल झाली होती. 
दरम्यान या घटनेचा विडिओ तसेच काही आक्षेपहार्य फोटो सोशल मीडियावर कोणीही वायरल करू नये असे आव्हाहन पोलीस विभाग तर्फे करण्यात आले आहे. असे केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती  उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव चिमूर यांनी दिली आहे. 
दरम्यान घटनेचा पुढील तपास  चंद्रपूर जिह्याचे पोलीस अधिक्षक  यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक राकेश जाधव हे करीत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!