जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत रोहित बोम्मावार विजयी - सावली तालुक्यातील तीन संचालक पाहणार कारभार
सावली : चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारी पतसंस्था "ब" गटातून सावलीचे रोहीत बोम्मावार हे प्रचंड बहुमताने विजयी झाले असून सावली तालुक्यातून संदीपभाऊ गड्डमवार व नंदाताई अल्लूरवार हे बिनविरोध निवडून आल्याने सावली तालुक्यातील तीन संचालक जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक १० जुलै रोजी २१ जागांपैकी १३ संचालक आधीच बिनविरोध निवडले गेल्याने उर्वरित ८ जागांसाठी मतदान झाले. आज ११ जुलै रोजी निकाल घोषित झाला असून त्यात शेतकरी विकास पॅनलचे व सावलीचे सुपुत्र रोहीत बोम्मावार हे प्रचंड मताधिक्याने निवडणूक जिंकले आहेत. त्यांना या निवडणुकीत २१३ मते मिळाली असून प्रतिस्पर्धी उमेदवार किशोर ढुमने यांना ६२, ऍड. वासुदेव खेळकर यांना १७ तर उमाकांत धांडे यांना ५ मते मिळाली आहेत. यापूर्वी काँग्रेसचे जेष्ठ नेते संदीपभाऊ गड्डमवार हे अ गटातून बिनविरोध निवडून आले असून ऐनवेळी भाजप पक्षात प्रवेश करीत महिला गटातून नंदाताई बिनविरोध निवडून आलेले आहेत. सावली तालुक्यात पहिल्यांदा निवडून आल्याने युवा नेतृत्व म्हणून रोहीत बोम्मावार यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!