चिमूरच्या हृदयांश व अनुष ने छत्रपती संभाजी नगर मध्ये जिंकली पदके
२ सुवर्ण तसेच २ कास्य पदकाची कमाई करीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच असोसिएशन ऑफ संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल चषक ४२ वी राज्य रोलर रिले स्केटिंग स्पर्धा २०२५ विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक. ०६/०७/२०२५ ला आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत विदर्भातील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ६०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला व त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर स्केटिंग अकॅडमीच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करीत ४ पदक काबीज केले ज्यामध्ये २ सुवर्ण पदक, २ कास्य पदकांचा समावेश करीत चिमूर चे नावलौकिक केले. स्पर्धेत १० व १२ वर्षे वयोगटातील हृद्यांश उमेश काटेकर याने ४०० मीटर स्पीड रेस मध्ये तिसरे स्थान काबीज करत १ कास्यपदक तर ३०० मीटर रिले रेस मध्ये पहिले स्थान काबीज करत १ सुवर्ण पदक पटकाविले. १४ वर्षे वयोगटातील अनुष श्रीकांत मार्गोनवार याने ४०० मीटर स्पीड रेस मध्ये तिसरे स्थान काबीज करत १ कास्यपदक तर ३०० मीटर रिले रेस मध्ये पहिले स्थान काबीज करत १ सुवर्ण पदक पटकाविले. व विजेते स्केटर्स ने आपले स्थान ४५ व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नोंदविले. सर्व विजेते स्केटर्स चिमुर स्केटिंग अकॅडमी चे नियमित खेळाडू असून चिमूर स्केटिंग अकॅडमी तसेच संपूर्ण चिमूरवासीयांकडून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे. सर्व विजेते स्केटर्स आपल्या यशाचे श्रेय कोच रोशनी उमेश काटेकर तसेच आपल्या पालकांना देत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!