तळोधी पोलीस स्टेशन परिसरामध्ये वृक्षारोपण

तळोधी पोलीस स्टेशन परिसरामध्ये वृक्षारोपण  (स्वाब संस्था, वन विभाग व पोलीस विभागाद्वारे १०० वृक्षांची लागवड)
तळोधी (बा.):
नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन च्या ग्राउंड परिसरामध्ये व मागिल बाजूस वन विभाग तळोदी बाळापुर, स्वाब फाउंडेशन तथा पोलीस स्टेशन तळोदी यांच्या संयुक्त विद्यमानाने 'वन महोत्सा निमित्ताने' शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी या परिसरामध्ये वन विभाग व स्वाब संस्थेने पुरविलेले वृक्ष लावण्यात आले . यावेळी वड, पिंपळ, हत्तीलेंडा, जांभूळ, गुलमोहर, कडुलिंब, सिसम अशा विविध वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली.
        शासन व वन विभागाच्या मार्फतीने संपूर्ण पावसाळ भर वन महोत्सव आयोजित करण्यात येऊन यावेळेस 'एक पेड मा के नाम'  अंतर्गत ठिकठिकाणी मोकळ्या जागेमध्ये विविध वृक्षांची लागवड केली जाते. या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या मागील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असल्याने विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. 
           पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार राहुल गुहे यांच्या हस्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. भास्कर पिसे, पि.एस.आय.किशोर मानकर, पी.एस.आय. चंद्रकांत लांबट तथा संपूर्ण महिला व पुरुष पोलीस कर्मचारी यांनी एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्ष लागवड केली. स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, शैक्षणिक विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, सर्पमित्र गणेश गुणगुले, शुभम निकेशर, आदित्य नान्हे, कैलास बोरकर, गोपाल कुंभले, इत्यादी सदस्य तर,तळोदी बाळापूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा मॅडम यांच्या मार्गदर्शनात वन विभाग चे तळोदीचे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक पंडित मेकेवार, राजेंद्र भरणे, संदीप चौधरी व वनरक्षक सौ. अयोध्या काळे,  वनमजूर , या सर्वांनी वृक्षारोपण केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!