बल्लारपूरच्या मिलिंद ट्रेडिंग वाईन शॉपवर पुन्हा कारवाही state excise duty
बल्लारपूरच्या मिलिंद ट्रेडिंग वाईन शॉपवर पुन्हा कारवाही state excise duty
बल्लारपूर प्रतिनिधी
बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : शहरातील मिलिंद ट्रेडिंग कंपनी (वाइन शॉप) वर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून बनावट देशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत शॉपी मालक पवन जयस्वाल (रा. विद्यानगर) याला अटक करण्यात आली असून, कारवाईत सुमारे एक लाख 31हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मिलिंद ट्रेडिंग कंपनीत प्लास्टिक पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू आणली जात होती. या माहितीच्या आधारे दुपारी १२ वाजता निरीक्षक संजय मिडारी आणि विशाल कोळे यांच्या नेतृत्वाखाली टीमने छापा टाकला.
कारवाईदरम्यान वाईन शॉपच्या गोडाऊनमध्ये ९ हजार बाटल्या आढळून आल्या, त्यापैकी १,५०० बाटल्यांत बनावट देशी दारू भरलेली होती. यानंतर पवन जयस्वालच्या राहत्या घरी सुद्धा छापा मारण्यात आला, जिथे देशी दारूच्या 20 पेट्या, विदेशी दारूच्या १3 पेट्या आणि बिअरच्या 8 पेट्या आढळल्या.
या सगळ्या कारवाईत ५०० एमएलच्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून बनावट दारू भरली जात होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तपासणीसाठी काही नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!