पावसाअभावी धान परे सापडले संकटात... शेतकऱ्यांची वाढली चिंता..
पावसाअभावी धान परे सापडले संकटात...
वरोरा.. जगदीश पेंदाम
उन्हाळ्यामध्ये मध्ये पाऊस पडून गेला मात्र पावसाळ्यामध्ये पावसाने हजेरी थोडीफार लावली असून शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीन, तूर,कपास पिके लागवड केली त्याचप्रमाणे ध्यानाचे परे सुद्धा टाकण्यात आले शेगाव परिसरात मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने गैरहजेरी लावली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ झालेली आहे त्यामुळे धान परे संकटात सापडली असून पिवळी पळायला लागलेली आहे, तसेच काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पराठी पिकांना खत दिले असल्यामुळे पावसाअभावी पिके सुकत चाचली आहे त्यामुळे एक-दोन दिवसात पाऊस नाही पडल्यास शेतकऱ्यावर दुष्काळाचे सावट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, ग्रामीण परिसरात अनेक शेती ही कोरडवाहू असून जमीन ही कडक होत चालली आहे, पावसाळ्याचे नक्षत्र मिरूग,अडदळा,तसेच मोठा फुक मध्ये पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे येणारा दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांची पिके उध्वस्त होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शेती हंगामात शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!