आज सरपंच आरक्षण सोडत - सावली तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन
सावली (विजय कोरेवार) -
ग्रामपंचायत सन २०२५-२०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली होती मात्र त्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता नियमानुसार जागा आरक्षित न केल्याने आज ८ जुलै रोजी दुपारी २ वाजता सावली तहसील कार्यालयाचे सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम २-ज (१) (२) नुसार सन २०२५-२०३० या ५ वर्षाच्या कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्गाचा प्रवर्ग आणि खुला प्रवर्गातील महिलांकरीता शासनाने सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करुन दिलेले होते. त्यानुसार सावली तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीकरीता सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानुसार अनुसुचित जातीकरीता ६, अनुसुचित जमाती करीता ९, नागरिकांचा मागासप्रवर्गाचा प्रवर्ग करीता १२, सर्वसाधारण प्रवर्गकरिता करीता २७ जागा आरक्षित करण्यात आले. मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्ग करीता २७ टक्के जागा आरक्षित न केल्याने मान. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशनुसार दुसऱ्यांदा सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. सावली तहसील कार्यालयात आज ८ जुलै रोजी दुपारी २ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नव्या आरक्षणानुसार तालुक्यात अनुसूचित जाती ६, अनुसुचित जमाती करीता ८, नागरिकांचा मागासप्रवर्गाचा प्रवर्ग करीता १५, सर्वसाधारण करीता २५ जागा राहणार आहेत. या सोडतीकरिता लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सावली तहसील प्रशासनाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!