सावली तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर - नामाप्र च्या ३ जागा वाढल्या

 

सावली (विजय कोरेवार) - ग्रामपंचायत सन २०२५-२०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदाचे आरक्षण आज तहसील कार्यालयाचे सभागृहात जाहीर करण्यात आले. थेट सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने सगळ्यांच्या नजरा आरक्षणाकडे लागलेल्या होत्या. आज मागील आरक्षणात काही ग्रामपंचायतीच्या आरक्षणात बदल झालेल्या आहेत.

      महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम २-ज (१) (२) नुसार सन २०२५-२०३० या ५ वर्षाच्या कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्गाचा प्रवर्ग आणि खुला प्रवर्गातील महिलांकरीता शासनाने सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करुन दिलेले आहे. त्यानुसार आज सावली तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीकरीता सरपंच पदाची आरक्षण सोडत सभा तहसीलदार प्रांजली चिरडे यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय सावली येथील सभागृहात पार पडली. 

असे आहेत प्रवार्गनिहाय्य राखीव जागा 

अनुसुचित जातीकरीता ६, अनुसुचित जमाती करीता ८, नागरिकांचा मागासप्रवर्गाचा प्रवर्ग करीता १५, सर्वसाधारण प्रवर्गकरिता करीता २५ जागा आरक्षित करण्यात आले. मागील आरक्षण सोडतीत अंशता बदल झालेला आहे.

सर्वसाधारण स्त्री राखीव - चिखली, मुंडाळा, डोंगरगाव, बोरमाळा, चांदली, चारगाव, कसरगाव, पालेबारसा, गायडोंगरी, उसरपार तुकूम, कढोली, निलसनी पेठगाव, विहीरगाव, साखरी, करगाव

अनुसूचित जाती स्त्री राखीव - अंतरगाव, चिचबोडी, निमगाव 

अनुसूचित जमाती स्त्री राखीव - बेलगाव, जिबगाव, व्याहाड बुज, मोखाळा 

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव - पेंढरी मक्ता, सायखेडा, मेहा बुज, जांब बुज, लोंढोली, गेवरा बुज, खेडी, मेहा बुज, उपरी 

अनुसूचित जाती सर्वसाधारण - कवठी, आकापूर, सामदा बुज 

अनुसूचित जमाती सर्वसाधारण - पारडी, वाघोली, निफंद्रा, थेरगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग - गेवरा बुज, पाथरी, डोनाळा, व्याहाड खुर्द, उसेगाव 

सर्वसाधारण ग्रामपंचायत - नवेगाव तुकूम, हिरापूर, केरोडा, मंगरमेंढा, गेवरा खुर्द, कापसी, घोडेवाही, हरंबा, करगाव, कोंडेखल, सोनापूर 

बदल झालेल्या ग्रामपंचायती -

सर्वसाधारण गटातून नागरिकांचा मागास प्रवर्ग - खेडी, चकपीरंजी

अनुसूचित जमाती प्रवर्गातून नागरिकांचा मागास प्रवर्ग - करोली 

सर्वसाधारण मधून महिला आरक्षण ग्रामपंचायती - उपरी, साखरी, गेवरा बुज, करगाव चक 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!