चिमूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी झाल्या आंधळ्या - संदीप कावरे ( सामाजिक कार्यकर्ते )

पावसाळा लागलेला असतांना देखील शहरातील नाले व नाली स्वच्छतेकडे विसर 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात नगरपरिषदेला असलेल्या मुख्याधिकारी यांनी आल्या - आल्या अतिक्रमण हटाव मोहिम राबवून जनतेमध्ये नाव कमाविले परंतु शहरातील स्वच्छतेकडे विसर पडलेला दिसून येत आहे. विविध प्रभागातील नाली स्वच्छ न झाल्याने नागरिकांना यामुळे होणारा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच शहराला लागून असलेला सात नाला सुद्धा भर उन्हाळ्यात स्वच्छ न झाल्याने जनतेला तसेच नाल्या लगत असलेल्या दुकानदारांना या दुर्गंधी चा त्रास सहन करावा लागत आहे. व तसेच राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत असलेल्या नाल्या सुद्धा उन्हाळयात स्वच्छ न केल्याने फुटपाथ वर असलेल्या दुकानदारांना सुद्धा दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे स्वच्छ भारत मिशन अभियान मोहिम राबविण्यात येते एक दिवस कर्मचारी अधिकारी स्वतः स्वच्छतेच्या नावाखाली फोटो सेशन करून शासनाला देखावा दाखवून काही महिलांना स्वच्छतेच्या सर्वे करीता नेमणूक करून जनतेकडून पॉझिटिव्ह फिडबॅक घेऊन पारितोषिक कामाविले जाते.हा सर्व देखावा असून जनतेचा पैसा कामाविना खर्च केल्या जात आहे.तर अतिवृष्टी बघता स्वच्छ न झालेल्या नाल्यामुळे चिमूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!