जिल्हास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळेचा भव्य शुभारंभ
जिल्हास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळेचा भव्य शुभारंभ
चंद्रपूर (दि. २२ जुलै) – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर (बाबूपेठ) येथे जिल्हास्तरीय सुलभकांसाठी आयोजित चार दिवसीय मूल्यवर्धन (3.0) प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन आज उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूरचे प्राचार्य डॉ. विनीत मत्ते होते.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांना मूल्यवर्धन वर्ग उपक्रम प्रभावीपणे राबविता यावा, विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये व संबंधित क्षमतेचा विकास करता यावा यासाठी मार्गदर्शन करणे हा आहे. यामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी करावी, तसेच या उपक्रमातील पद्धतींचा उपयोग इतर विषयांच्या अध्यापनात कसा करता येईल, हे प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगितले जात आहे.
शांतीलाल मुथ्था फाउंडेशन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर आणि शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक), प. व. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण सुरू २२ जुलै २०२५ पासून पुढील चार दिवसांत सुलभक शिक्षकांना विविध सत्रांद्वारे मूल्यशिक्षणाची प्रभावी पद्धतशीर मांडणी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात हिराचंद रोहनकर मुथ्था फाउंडेशनचे मुख्य ट्रेनिंग टीचर हिराचंद रोहनकर, दीक्षांत बेले जिल्हा समन्वयक,अशोक वनवे तालुका समन्वयक पाथर्डी, तस्मिन बागवान तालुका समन्वयक पारनेर हे उपस्थित होते.अशा विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून सत्रांमध्ये सबतकौर भोंड, अरुण झगडकर, मंजुषा चिमूरकर, राजेंद्र परतेकी, निखिल ठमके, मोहम्मद इरफान शेख, लक्ष्मण खोब्रागडे, काकासाहेब नागरे, कुणाल दुधे यांची राज्य तज्ञ सुलभक म्हणून निवड करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, पोंभुर्णा , बल्लारपूर, राजुरा, मुल, भद्रावती, चंद्रपूर, वरोरा तालुक्यातील जिल्हास्तरीय तज्ञ सुलभक या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. विविध चर्चासत्र, कृतीमूलक प्रशिक्षण आणि उपक्रमांचे सादरीकरण यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मूल्यशिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे प्रशिक्षण निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!