अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई.
भद्रावती/ वरोरा...जगदीश पेंदाम
एका गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वरकारवाई करीत वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई नागपूर चंद्रपूर हायवे मानोरा फाट्याजवळ हॉटेल जमघट जवळ मांगली नाल्या,वरून भद्रावती शहराकडेकडे जात असलेल्या एक ब्रास भरून असलेल्या ट्रॅक्टर वर महसूल विभागाच्या गौण खनिज पथका कडून कारवाई करण्यात आली. एम एच 34 p77 या क्रमांकाचा ट्राली क्रमांक एम एच 34L/908 ट्रॅक्टर वाहनात अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली. सदर ट्रॅक्टर हा श्रीकृष्ण गणपत जीवतोडे राहणार भद्रावती यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी रमेश आवारी ग्राम महसूल अधिकारी खुशाल तुरारे यांनी केली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!