प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उद्या राष्ट्रीय मार्ग ३५३ ई वर शेगाव बु येथे चक्काजाम..।
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उद्या राष्ट्रीय मार्ग ३५३ ई वर शेगाव बु येथे चक्काजाम..।
शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगाच्या विविध प्रश्न, मच्छिमार आदिच्या मागण्यावर राज्यव्यापी आंदोलन होनार...
वरोरा... जगदीश पेंदाम
उद्या दिनांक २४ जुलै २०२५ ला वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक येथील बस स्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे चक्काजाम आंदोलनाच्या आयोजन केलेले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या काळात राज्य सरकारने केलेल्या घोषणांपैकी प्रामुख्याने मागणी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ, आधी मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शन मध्ये उद्या दि. २४ जुलै ला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यांच्या एकदा भाग व पाठिंबा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांच्या मार्गदर्शनात शेगाव येथील बस स्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर या सर्व मागण्या सरकारने मान्य करावे म्हणून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. शेरखान पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव, मेंढपाळ, मच्छीमार हे सहभागी होणार असून, सुमारे दोन तास हे आंदोलन चालणार आहे. तसेच सर्व पक्षातील, समाजातील लोकांनी आपसातील मतभेद व पक्षपात दूर ठेवून शेतकरी, मंजूर, यांचे हितासाठी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावे अशे आव्हाहन प्रहार पक्षा कडून करण्यात आले आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!