नवेगाव भुजलात डायरियाची साथ.. बेंबाळ येथे रुग्णांची गर्दी



मूल तालुक्यातील नवेगाव भुजला येथे डायरियाची लागण झाली असून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बेंबाळ येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात उपचारासाठी भरती होत आहे. ग्रामपंचायत ने पिण्याच्या पाण्याची योग्य प्रकारे स्वच्छतां न ठेवल्याने, गावात डायरीयाची साथ उद्भवल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
मागील तीन दिवसापासून सतत डायरीयाचे पेशंट वाढत असून अनेकांनी खाजगी दवाखान्यातही उपचार घेतले आहे. बेंबाळ येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात नवेगाव भुजला येथील रुग्णांची संख्या वाढत आहे. मूल उपजिल्हा रुग्णालयात देखील नवेगाव भुजल्याचे रुग्ण दाखल होत असल्याची माहिती आहे.  पंचायत समितीचे एका अधिकाऱ्यांनी नवेगाव बुजला आणि प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान  ग्रामपंचायतने  पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
जुनासुर्ला आणि कोरंबी येथील आशा वर्कर नवेगाव भुजला येथे रुग्णांचे सर्वेक्षण करीत असून गावात सुमारे 40 चे वर पेशंट डायरीया ने आजारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 15 चे वर पेशंट बेंबाळ येथे प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात उपचार घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!