सिंदेवाहीत पुन्हा रानटी हत्तीची एन्ट्री , एकाला चिरडले

सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर येथील घटना

तालूका - प्रतिनिधी ( यश कायरकर )

सिंदेवाही : - ओडिसा वरून छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालेले हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात ३० मे रोजी एन्ट्री केली होती . काही दिवसानंतर माघारी फिरत गडचिरोली जिल्हयात वापस गेले होते . पुन्हा १३ जुर्ले शुक्रवार रोजी सावली तालुक्यात आढळून आलेले हत्ती सिंदेवाही तालुक्यात आगेकुच करीत जाटलापूर मोठा येथील प्रातर्विधीस गेलेल्या इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे . मृतक इसमाचे नाव मारोती कवडु मसराम ( वय 70 ) असे आहे .

३० मे रोजी चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यात दाखल झालेले दोन टस्कर हत्ती धुमाकुळ घालविला होता . वापसीनंतर पुन्हा चंद्रपूर जिल्हयात १३ जून रोजी हजेरी लावली आहे . चंद्रपूर जिल्ह्यात रानटी हत्तीच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना  ही पहिल्यांदा घडली आहे त्यामुळे वाघ हल्ल्याच्या घटने नंतर हत्तीच्या हल्ल्याची घटना उघडकीस आल्याने मानव व वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे . हत्तीच्या ऐन्ट्रीने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग वाघ व हत्तीचा बंदोबस्त करण्यास कुचकामी ठरत असल्याची ओरड जनतेत केली जात आहे .
     वैनगंगा नदी ओलांडून सावली वनपरिक्षेत्रातील आसोलामेंढा परिसरात आढळून आलेले दोन टस्कर हत्तीने सिंदेवाही वनपरिक्षेत्र परिसरात प्रवेश करित सिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालय च्या जवळ असलेल्या जाटलापूर मोठा येथील इसम सकाळी ६ वाजताच्या सुमारास शौचास गावाबाहेरील परिसरात गेला असता हत्तीने चिरडून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस येताच सिंदेवाहीत खळबळ उडाली आहे . घटनेची माहीती वनविभाग व पोलीस विभाग यांना कळताच घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदासाठी सिंदेवाही शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले . १५ दिवसात टस्कर हत्तीने दुसऱ्यांदा प्रवेश केल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून गाव परिसरात दहशत निर्माण झाली आहे तरी वनविभागाने हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!