बचत गटाच्या खात्यातून १ लाख ७८ हजार लंपास - बँकेसमोर आंदोलनाचा सदस्यांचा इशारा @ पत्रकार परिषदेतून बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
सावली - मुंडाळा येथील जय पवनसुत पुरुष शेतकरी बचत गट यांच्या पाथरी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतील खात्यातून तब्बल १ लाख ७८ हजार रुपये लंपास झाल्याचे गटाच्या अध्यक्ष व सचिव यांच्या लक्षात आले मात्र ही रक्कम कुठे गेली याबाबत बँक व्यवस्थापक समाधानकारक उत्तरे देत नसल्याने व असा प्रकार इतरही खातेदारकांच्या बाबतीत घडत असल्याने बँकेसमोर आंदोलनाचा इशारा गटाच्या सदस्यांनी दिला आहे.
मुंडाळा येथे जय पवनसूत पुरुष बचत गट मागील १४ वर्षांपासून सुरळीत सुरु आहे. ९ मे रोजी गटाच्या खात्यात पूर्ण रक्कम असतांना व त्यानंतर कोणताही व्यवहार झाला नसतांना मात्र १२ मे रोजी १ लाख ७८ हजार रुपये खात्यातून कमी झाल्याची बाब अध्यक्ष व सचिव जेव्हा बँकेत पैसे काढायला गेले तेव्हा लक्षात आले. याबाबत सदस्यांनी बँक व्यवस्थापकाकडे चौकशी केली असता युपीआय पेमेंट झाल्याचे सांगितले मात्र कोणताचा मोबाईल नंबर लिंक नसल्याने गटाचे या उत्तराने समाधान झाले नाही. सदर बँकेतून दामोदर पाटील गोबाडे यांचे २४०० रुपये, खिनचद कोकोडे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे १० हजार रुपये गहाळ झाल्याने बँकेच्या कार्यप्रणालीवर सदस्यांनी शंका उपस्थित केले आहे. जय पवनसुत बचत गटाचे पैसे बँकेने परत करावे अन्यथा महाराष्ट्र बँकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बचत गटाचे अध्यक्ष दामोदर गोबाडे , सचिव जितेंद्र गोबाडे, भाऊराव भरडकर, गणपती शेंडे , नारायण खोब्रागडे , मोरेश्वर मेश्राम, विजय नागापुरे, कर्मवीर भरडकर संदीप गोबाडे, वामन गोबाडे, बळीराम दाचेवार आदींनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
मी हेड ऑफिसला 14 तारखेला कंप्लेंट केलेली आहे. बचत गटाने पोलीस तक्रार करावी. मी सायबर सेल सायबर क्राईम कडे सुद्धा तक्रार नोंदवलेली असून ही रक्कम मिळविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहेमंगेश गणवीर
व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र पाथरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!