वादळ मुसळधार पावसात छप्पर उडाले - खेडी येथील शेडमाके कुटुंब उघड्यावर

 

सावली - शुक्रवारी रात्रो वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसात खेडी येथील गणपत विठ्ठल शेडमाके यांच्या घराचे छप्पर उडाल्याने कुटुंबाला उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे.

        खेडी येथे गणपत शेडमाके हे आपल्या पत्नीसह दोघेच राहतात. काल रात्रो मेघ गर्जनेसहीत वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शेडमाके कुटुंब घरातच असतांना पूर्ण छप्पर उडाले. त्यात कुटुंब थोडक्यात बचावले मात्र अन्न धान्य पावसात भिजले आहे. छतच उडाल्याने संसार उघड्यावर आले आहे. प्रशासनाने पंचनामा करून मदत करण्याची मागणी शेडमाके कुटुंबाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!