जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने तीन जनावरांचा मृत्यू
एम. एस.ई.बी. च्या अधिकारी व कर्मचारी यांचे हलगर्जी पणामुळे शेतकऱ्याची जनावरांचा मृत्यू
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - दिनांक. १६ मे २०२५ ला सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळी पाऊसामुळे वरोरा तालुक्यात येत असलेल्या वडधा तु. या गावा लगत असलेल्या शेतात जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने तीन जनावरांची मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. वादळी पावसाने जिवंत विद्युत तारा शेगाव येथून असलेल्या वडधा याठिकाणी विजेच्या तारा तुटून खाली पडल्या असता गावातील नागरिक यांनी चारगावं बु येथील सब स्टेशनचे सहाय्यक अभियंता व लाईन मेन यांना वारंवार फोन द्वारे माहिती दिली. एम. एस. ई. बी. चे कर्मचारी यांनी पूर्ण रात्र जाऊन लाईट बंद केली नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळीच नेहमी प्रमाने वसंता घुघल हे आपल्या शेतात जणावरे घेऊन जात असताना गावा शेजारी असलेल्या अशोक डोमाजी मत्ते यांचे शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने वडधा येथील १ बैल, १ गाय, १ वासरू असे एकूण ३ जाणवरे जागीच मृत्यूमुखी पडले. त्याच्या मागोमाग शेतकरी वसंता घुघल हे सुद्धा आणखी ६ ते ७ जाणवरे घेऊन होते. समोरील जणावरे इचानक करंट लागुन पडलेल्यामुळे त्यांना हा प्रकार लक्षात आल्याने इतर जणावरे त्यांनी दूर हाकलून लावली व स्वतःही दूर होऊन गावात माहिती दिली. गावकऱ्यांनी अगोदर माहिती तारे पडल्याची माहिती दिली असता विद्युत प्रवाह बंद न केल्यामुळे जनावरांच्या मृत्यू झाला त्यामुळे गावकऱ्यांनी या बाबत आक्रमक भूमिका घेते एम एस ई बी कर्मचाऱ्यावर रोष व्यक्त केला.जोपर्यंत शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याच प्रकारे पंचनामा करण्यात येणार नाही अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी काही वेळा पर्यंत अधिकार समोर मांडली होती. आधिच एकीकडे शेतमालाला योग्य भाव नसल्याकारणांनी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यातच आता अशा आकस्मित संकटाने शेतकरी मात्र पूर्ण पणे खचलेला गेला आहे.या दरम्यान घटनेचा मोका पंचनामा वडधा तु. चे पटवारी पवार यांनी केला असून त्या वेळी गावातील पोलीस पाटील रिता प्रमोद लेडांगे, माझी सरपंच सुनिल सातपुते, सामाजिक कार्यकर्ते अभिजित पावडे, बाळकृष्ण डाहुले, मंगल बुरान, आदी गावातील नागरिक, महिला उपस्थिती होते. तसेच चारगावं बु येथील पशु वैद्यकीय अधिकारी डांगरे, बारेकर यांनी घटनास्थळ पंचनामा केला आहे.तसेच शेगाव पोलीस स्टेशन चे कर्मचारी नितीन भैसारे व रजकुमार उकेटोयने उपस्थित होते. या घटने बद्दल एम.एस.ई. बी. चे सहाय्यक अभियंता यांना विचारणा केली असता मला फक्त गावातील लाईट डिम असल्याची माहिती फोन वर आली होती. तार तुटल्याची कोणतीही माहिती मला आलेली नाही अशी महावितरण सहायक अभियंता रामटेके चारगाव बु.यांनी माहिती दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!