पवनीत दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक.१५/०५/२०२५ गट साधन केंद्र,पवनी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या आणि आता लवकरच पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या १८ दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वितरण करण्यात आले.पं.स.पवनीचे सभापती, विठ्ठलराव नारनवरे यांच्या हस्ते हे साहित्य किट विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना नारनवरे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर दिला आणि या उपक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमाला पंचायत समिती पवनीचे विस्तार अधिकारी (शिक्षण) संजयकुमार वासनिक, माजी मुख्याध्यापक तथा पत्रकार बी. के. बागडे आणि समग्र शिक्षा विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.विस्तार अधिकारी वासनिक यांनी सांगितले की,'समावेशित शिक्षण' या धोरणांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत आणि हे शैक्षणिक साहित्य त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत करेल. बागडे यांनी या उपक्रमाच्या आयोजकांचे अभिनंदन केले आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा कार्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या शिक्षणाला एक नवी दिशा मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!