पवनी येथील सानिया शेखचे शालांत परीक्षेत देदीप्यमान यश

मुख्याध्यापिकांनी घरी जाऊन केला विद्यार्थी चा सत्कार

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक.१५/०५/२०२५ सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, पवनीची विद्यार्थिनी सानिया शेख हिने नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी सानियाच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ व मिठाई देऊन तिचा सत्कार केला.याप्रसंगी सानियाचे पालक,तसेच विद्यालयातील शिक्षक अशोक गिरी,सिद्धेश्वर फड,ललिता डेकाटे,संदिप मुंडले,नीता मोटघरे आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी सानियाच्या अथक परिश्रमाचे कौतुक केले आणि तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सानियाने कला शाखेत शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.तिच्या या ध्येयाबद्दल तिने यावेळी कृतज्ञता व्यक्त केली आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश संपादन करता आल्याचे सांगितले. सानियाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!