पट्टेदार वाघाच्या हल्यात चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवसात सहा महिलांचा बळी
पोटाची भूकच ठरली तिच्या साठी कर्दनकाळ
तेंदूपत्ता रोजगार मृत्यूस देत आहे आमंत्रण
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. १४/०५/२०२५ चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढतच चालले असून सलग चौथ्या दिवशी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रात येत असलेल्या करबडा येथील रोपवनात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या कचराबाई अरुण भरडे वय ५४ वर्षे या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला केला असता तिचा घटनास्थळीच मृत्यु झाला.हि घटना आज सकाळी ०९:०० वाजता च्या दरम्यान उघडकीस आली. वाघाची दहशत व भिती सर्वत्र आहे.मागील चार ते पाच दिवसापासून पट्टेदार वाघ हा कुमराज चौधरी यांच्या शेतातील टाक्यात पाणी पिण्यासाठी येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली होती मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातातच अशी अवस्था असल्यामुळे कचराबाई आपल्या पती सोबत सकाळी ०८:०० वाजताच्या सुमारास गावाशेजारील चौधरी यांच्या शेतीला लागूनच असलेल्या रोपवनात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेली होती.यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला तेव्हा महिला ओरडली व ओरडण्याच्या आवाजाकडे तिच्या पतीचे लक्ष गेले असता चक्क वाघाने त्या महिलेच्या मानेला तोंडात पकडून फरकटत नेत असताना बघीलते आणि गावात जाऊन नागरिकांना या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच क्षणी गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा कचरा बाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काही वेळ आक्रमक भूमिका घेत जंगलाला कुंपण करा,गावाभोवताल तारचे कुंपण करा,मुलाला नौकरी द्या,अशा मागण्या मान्य करा तरच डेट बॉडी उचला अन्यथा उचलू नका असा आक्रमक पवित्रा मयत महिलांचा मुलगा व ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र वनविभाग व पोलीस विभागणी पूर्ण माहिती देत आक्रमक झालेल्या नागरिकांना शांत करून शव हे शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम,वनपाल विनोद किलनाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे,पोलीस उप निरीक्षक दिप्ती मरकाम वआदी
पोलीस कर्मचारी वनकर्मचारी वनमजूरांची यावेळी उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!