चिमूर भिसी मार्गावर असलेल्या कन्हाळगाव येथे गावालागत असलेल्या तनशीच्या ढिगाऱ्यास लागली आग
अग्निशमन दल तथा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मिळून आगीवर मिळविले नियंत्रण
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वरून भिसी मार्गावर १० किमी अंतरावर असलेल्या कन्हाळगाव येथे आज दिनांक.१५/०५/२०२५ ला रात्री ०१:०० वाजताच्या दरम्यान आग लागली असता भारतीय जनता पार्टी पक्षाचे बूथ अध्यक्ष स्वप्नील भुसारी यांनी भाजप कार्यकर्ते शुभम भोपे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. शुभम भोपे यांनी घटनेची सविस्तर माहिती नगर परिषद चिमूर च्या अग्निशमन दलाला दिली.माहिती मिळताच क्षणी तात्काळ अग्निशमन दलाच्या वाहणासोबतच चिमूर वरून घटनास्थळी जाऊन आशू ठाकूर , सागर वांढरे, सूरज भरडे, वैभव पराते तथा आदी भाजप कार्यकर्ते यांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळविले व उपस्थित गावातील नागरिकांनी अग्निशमन दलाचे आणि भाजप च्या कार्यकर्त्यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!