विनोद टेंभुर्णे यांच्या जन्म दिनानिमित्त विविध उपक्रम

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाचा दिवस असतो. प्रत्येकांची वाढदिवस साजरा करण्याची वेगळी थीम, वेगळी रीत पहावयास मिळते. काहींच्या जोरात पार्ट्या तर काहीजण सामाजिक भावना जोपासून वाढदिवस साजरा करतांना दिसतात. याच प्रमाणे समाज हितासाठी काही संकल्प घेऊन वाढदिवस साजरा करणारे विदर्भ युवा क्रांती विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद टेंभुर्णे यांनी अनाथ मुला - मुलींना अन्न व कपडे वितरण, रुग्णांना फळ वाटप, आत्ताच लागलेल्या निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन यासह अनेक उपक्रम राबविले. वाढदिवसाचे औचित्य साधत विनोद टेंभुर्णे यांनी नव्याने तयार होत असलेल्या पवनी येथील  उपजिल्हा रुग्णालयाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपजिल्हा रुग्णालय पवनी असे नाव मिळावे या आषयांचे निवेदन तहसीलदार पवनी यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून युवा वर्गाच्या हातून रुग्ण सेवा घडावी असा उद्देश मनी बाळगून सदर मागणी केली असल्याचे विनोद टेंभुर्णे यांनी मत स्पष्ट केले. सदर निवेदन संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात विनोद टेंभुर्णे  यांनी नेतृत्व करत नितेश सोनटक्के, हितांशू टेंभुर्णीकर, दीपक सिंग टाक, आर्यन गजभिये, पराग टेंभुर्णे, आदित्य दहिवले,अनुराग घोडीचोरे, पियुष खापर्डे, नीरज मेश्राम, हिमांशू  खोब्रागडे, आकाश घोडीचोरे यांच्या उपस्थितीत तहसीलदार पवनी यांना सुपूर्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!