चिमूर शहरात वाहतूक पोलिसांचा सर्वसामान्य नागरिकांना होतोय नाहक त्रास

खुलेआम अवैधरित्या ओव्हरलोड चालतात वाहने

यांना आशीर्वाद तरी कुणाचा?

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दिवस रात्र खुलेआम रेती, गिट्टी, मुरूम, दगडी कोळसा याची अवैधरित्या व ओव्हरलोड वाहने चालत असून याकडे चिमूर पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. तर सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर यांच्या वाहणाला अडवून नाहक त्रास देत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. सर्रास नियमांचे उल्लंघन करून चिमूर चंद्रपूर ट्रॅव्हल्स,चिमूर वरोरा चालणारी चिमूर क्रांती बस यांना चालन न देता बसस्थानकपासून २०० मीटर च्या आत अवैधरित्या प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याबाबत आगार प्रमुखांनी अनेक तक्रारी पोलीस स्टेशन ला दिल्या गेल्या असून सुद्धा याकडे वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे यास दोषी कोण असा जनतेमध्ये? निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!