जांभुळघाट येथे अवैधरित्या दारू विक्रेत्या दुकानदाराने बाहेरून आलेल्या पोलीसास केली मारहाण

भिसी पोलीसाला माहीती मिळताच गाठले घटणास्थळ

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथील बाजार चौकात मागील कित्तेक दिवसा पासुन खुले-आम अवैधरित्या दारूची सर्रास विक्री सुरू आहे.याकडे भिसी पोलीसांचे लक्ष कसे का पुरत नाही?दिनांक.१५/०५/२०२५  ला सायकाळी ८ ते ९ च्या दरम्यान मेटेपारला लग्नाला आलेला पोलीस हा जांभुळघाट ला आला, अवैधरित्या दारू विक्रीच्या पानठेल्यात गेला असता मी पोलीस आहे मला दारू पाहीजे या वरून अवैध दारू विक्रेता बरोबर दोन-दोन गोष्टी होऊन हातापाई झाली.यात पहील्यांदा आलेल्या पोलीसाने दारू विक्रेता याला मारहान केली.नंतर अवैध दारू विक्रेताच्या मित्र मंडळी यानी पोलीसाला चांगलाच तुडवल्याची चर्चा रंगली.या घटनेची भिसी पोलीसांना माहिती मिळताच घटना स्थळी दाखल झाली.व मारहाण प्रकरण शांत करून घटनेची संपूर्ण चौकसी केल्यानंतर मारहाण करणाऱ्या पोलीसाला गावाला पाठवण्यात आले.नंतर भिसी पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरीक्षक मुकेश ढोबळे व बिट जमादार अजय बगडे हे घटना स्थळी दाखल झाले व या घटनेची चौकसी करीत आहे.बरेचश्या दिवसा पासुन बाजार चौकात व इतर ठीकानी अवैध दारूचे धंदे सुरू आहेत.या अगोदर शुध्दा बाजार चौकात असलेल्या दारू विक्रेतेच्या दुकानात चाकूने एकमेका वर हल्ला चढावील्याची घटना घडली होती. छोटया-मोठया नियमित घटना होत असतात.काही तर अवैध दारूचे दुकाच आटवडी बाजाराच्या मधोमधी असल्याने बाजारा येणाऱ्या महीला व नागरीकाना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा या ठिकानाची दारू बंद करण्यात यावी अश्या प्रकार मागणी होऊन शुध्दा आता पर्यंत बाजार चौकातील व इतर ठीकानाची दारू बंद झालेली नाही. समोर या ठिकानी मोठी घटना अशाप्रकारे होऊ नये.यासाठी पोलीसानी काळजी घेणे गरजेचे आहे.या अवैध धंद्या मागे पोलीसांचा आर्शिवाद असल्याची जनसामाण्य मध्ये चर्चा होत आहे.या कडे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष देउन अवैध धंदे बंद करण्यात यावी अशा प्रकारची मागणी गावातील स्थानिक नागरीकांकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!