मुख्य मार्गावरील मुख्य चौकांमध्ये गतिरोधक द्या - विदर्भ युवा क्रांती संघटनेची मागणी

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - गेल्या पाच वर्षांपासून निर्माणाधीन  असलेल्या पवनी शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जळ वाहतूक होते. पवनी तालुका रेती तस्करीचा माहेरघर असल्याने रोज हजारो रेतींच्या ट्रकांची आवागमन या महामार्गावरून होत असते. त्यातल्या त्यात महामार्गावर कोणत्याच प्रकारचे गतिरोधक नसल्याने मोठे ट्रक भरधाव वेगाने सुसाट पडतात. अनेक गंभीर अपघात यामुळे घडल्याचे पवनी वासीयांनी यापूर्वी पाहिले आहे. पवनी शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील मुख्य चौकांमध्ये गतिरोधक लागल्यास भविष्यात होणारे अपघात व नाहक जाणारे बळींची संख्या कमी होईल त्या दृष्टिकोनातून विदर्भ युवा क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद टेंभुर्णे यांच्या मार्गदर्शनातून पवनी तालुका अध्यक्ष संतोष वाघमारे व पवनी शहर अध्यक्ष दिपक सिंग टाक यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पवनी व महामार्ग प्राधिकरण यांना लवकरात लवकर मुख्य चौकांमध्ये गतिरोधक किंवा बॅरिगेट लावण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना विदर्भ युवा क्रांती संघटनेचे हितांशू टेंभुरकर, राकेश  काटेखाये, गणेश भिवगडे, सुजल उंदीरवाडे, अहमद अब्दुल रहमान, उरकुडा शिवरकर, कुंदा शेंडे, कल्याणी आडीकने आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!