वैनगंगा नदीत वैद्यकीय शिक्षण घेणारे ३ विद्यार्थी बुडाले

सावली :- 

       सावली तालुक्यातील व्याहाड बूज. जवळील वैनगंगा नदीखाली आज दिनांक १० मे रोजी अंदाजे दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेज गडचिरोली येथील प्रथम वर्षात शिकत असलेले ३ विद्यार्थी यांचा वैनगंगा नदीत बुडाल्याची घटना आज घडलेली आहे. 

       चंद्रपूर गडचिरोली महामार्गावरील व्याहाड बुज. जवळील वैनगंगा नदीच्या पुलाखाली आज मेडिकल कॉलेज गडचिरोली येथील गोपाल गणेश साखरे , पार्थ बाळासाहेब जाधव , स्वप्निल उद्धवसिंग शिरे , शिवम श्रीधर जायभाई , सार्थक राजेश पाठक , सुजित धनाजी देशमुख हे विद्यार्थी आंघोळीसाठी आले असता ते आंघोळ करत असताना दुपारी ४:०० वाजेदरम्यान ६ विद्यार्थ्यांपैकी तिघेजण बुडाल्याची वार्ता त्यातीलच तीन विद्यार्थ्यांनी सांगितलेली आहे . गडचिरोली येथील मेडिकल कॉलेज मध्ये शिकत असलेले ६ विद्यार्थी आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळे वैनगंगा पुलाखाली जाऊन तिथे पोहण्याचा आनंद लुटण्याचा बेत बहुतेक करून येथे आले असावे आणि पोहोत, आंघोळ करीत असतानाच त्यातीलच ३ विद्यार्थी गणेश साखरे ( वय 20 वर्ष) रा. चिखली , जि. बुलढाणा , पार्थ बाळासाहेब जाधव ( वय २० वर्ष) रा. शिर्डी , जिल्हा अहमदनगर , स्वप्निल उद्धवसिंग शीरे ( वय २० वर्ष ) संभाजीनगर ,  हे वैनगंगा नदीमध्ये बुडाल्याची माहिती आहे . 

       सदरची माहिती पोलीस ठाणे सावली यांना मिळताच काही वेळ शोध मोहीम राबविली. मात्र वृत्त लिहीपर्यंत मृतदेह हाती लागले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!