जंगलात तेंदूपत्ता तोडण्याकरिता गेलेल्या महिलेवर जंगली डुकराचा हल्ला
महिला गंभीर जखमी
उपजिल्हा रुग्णालयात उपचार सूरू
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. ०८/०५/२०२५ ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या मुरपार येथील राहिवासी सुंदराबाई रतीराम दोडके वय ६४ वर्षे यांचेवर सकाळी ७ वाजताच्या सुमारास संरक्षित वन क्षेत्र क्रमांक. ३४८ मध्ये तेंदूपत्ता तोडत असतांना जंगली डुकराने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून गावकऱ्यांना याची माहिती मिळताच क्षणी जंगल गाठून तात्काळ जखमी महिलेला प्रथमोपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती वनविभागाला प्राप्त होताच उपचारादरम्यान आर. एफ.ओ. के.बी देऊळकर यांच्या मार्गदर्शनात यू.बी लोखंडे क्षेत्र सहाय्य्क मुरपार, आर.बी. केदार वनरक्षक मुरपार यांनी घटनास्थळ पंचनामा करीत जखमीची भेट घेऊन सर्व घटनेची माहिती घेत पुढील तपासास सुरुवात केली. वन्यप्राण्यांचे अशाप्रकारे मानवांवर होणारे हल्ले वाढतच चालले असून वन्य प्राणी आणि मानव यांच्यात संघर्षाची भूमिका निर्माण झाली आहे. बेरोजगार रोजगार कमाविण्याच्या नादात वाघाच्या दरीत जाऊन रोजगार कामवितांना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!