अवैध दारू विक्री बंद साठी गावांमध्ये सभा
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अर्जुनी तुकून येथील अवैध देशी दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम पंचायत पटांगणामध्ये सभा घेण्यात आली.तालुक्यातील पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्जुनी येथे अवैध देशी दारू सुरू असल्यामुळे गावातील युवकांचं व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले तसेच अनेकांच्या घरांतील संसार उघड्यावर पडली असून गावामध्ये चौका चौकात मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होताना दिसत आहे. यामध्ये गावातील नागरिकांनी अवैध दारू विक्री बंद करण्याकरीता ग्रामपंचायत पटांगणात सभा घेण्यात आली असून यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गुरुदेव मंडळाचे अध्यक्ष, माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, गावातील महिला, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!