अवकाळी पावसाने शेत पिकाचे नुकसान - खासदार किरसान यांनी सावली तालुक्यात केली पाहणी

सावली -  तालुक्यात गारपीटीसह अवकाळी पाऊस सतत येत असल्याने शेतातील उन्हाळी धान व मक्का पिकाला जोरदार फटका बसलेला आहे. संपूर्ण धान नष्ट झाले असता गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे  खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सोनापुर, हेटी, सामदा,  वाघोली बुटी व व्याहड बुज. या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी केली. सदर नुकसानीचे रीतसर वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सुचना तलाठी व कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांना दिल्या.  

           परिसरात अनेक शेतकरी उन्हाळी सिंचनाची सोय असल्याने धान पिकाचे व मक्का पिकाची लागवड करीत असतात. परंतु सतत दोन- तीन दिवस पडणारा पाऊस, वादळी वारा व गारपीटमुळे शेतकऱ्यांचे तोंडातील घास गेलेले आहे. ऐन कापणी व मळणीला आलेल्या धानपिकाचे व मक्कापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेवून उन्हाळी धानाची लागवड केलेली होती. परंतु गारपीट व पावसाने झालेल्या नुकसानीमुळे उन्हाळी पिक कसे काढायचे व बँकेचे कर्जे कसे फेडायचे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नुकसानीची पाहणी करीत पंचनामे पाठविण्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यास सूचना दिल्या. 

         यावेळी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनिल बोमनवार, काँग्रेस कार्यकर्ते मिथुन बाबनवाडे, डोमाजी शेंडे, दिवाकर वाघाडे, संजय वाघाडे, तुकाराम सानारे, किशोर देशमुख, वाल्मीक कांबडे, गुरुदास सोनुले, दिनेश भोई, चंद्रशेखर रणदिवे, नरेश भुरसे, संजय भुरसे, किशोर लटारे, खुशाल बोदलकर, दिनकर वाघाडे, श्रीधर सोनुले, तुळशीदास मेश्राम, निरंजन भुरसे, मोहनदास गुरमुरे, गुरु सोनुले, सामदा गावातील स्वप्निल पाटील भांडेकर, रुमाजी कोहळे, मनोज खेवले, अमोल पाल, ढीवरुजी कोहळे, बंडू पोहनकर, मोरेश्वर निकुरे, सखाराम देवतळे, राहुल गांगरेवार, कालिदास सोनटक्के, सुनील चालख, मिलिंद हजारे, संदीप सोमानकर वाघोली गावातील रमेश वाघरे, रामचंद्र गवारे, देवेंद्र भोयर, कालिदास गिराम, रोशन भांडेकर कुषी अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व गारपीट ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!