अवैधरित्या रेतीची वाहतुक करतांना महसूल पथकाने तीन ट्रॅक्टर केली जप्त
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील पळसगाव पिपर्डा येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल पथकाने बुधवारी दिनांक. ०७/०५/२०२५ ला रात्री १२ वाजता पळसगाव येथील ऊमा नदी घाटावर तीन ट्रॅक्टर पकडण्यात आले असून रात्रौलाच ट्रॅक्टर चिमूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
जप्त केलेले तीनह ट्रॅक्टर हे विना नंबर चे असून पळसगाव येथील अनिल गोकुल सोनेकर, बादल अशोक सोनेकर, विनायक सीताराम ठाकरे यांच्या कडे हे ट्रॅक्टर होते. जप्त केलेल्या मालकांवर दंड ठोठावण्यात येणार आहे. ही कारवाई तहसीलदार श्रीधर राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, संजय चाचरे, स्वप्नील उमरे ,संदीप मुंडे,चेतन घरकेले या महसूल पथकाने हि संपूर्ण कार्यवाही केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!