सराईत गुन्हेगाराला रामनगर पोलीसांनी केले गजाआड

घरफोडी, जबरी चोरीसह मोटासरायकल चोरी असे एकूण ५ गुन्हे उघडकीस

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.१०/०५/२०२५ रोजी चंद्रपूर शहरात मालमत्तेविरूद्ध गुन्ह्यांना प्रतिबंध करून दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक सुदर्शन  मुमक्का यांनी रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी असिफराजा शेख यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक असिफराजा शेख यांना पोलीस स्टेशन रामनगरचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जबरी चोरी, घरफोडी व मोटारसायकल चोरी करणारे चोरांबाबत गोपनीय माहिती काढून चोरीचे गुन्ह्यांची उकल करण्याबाबत चे आदेशीत केले होते.त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार पो.स्टे. रामनगर येथे दाखल अपराध क्र. ३६८/२०२५ कलम ३३१(३),३३१ (४), ३०५ भा.न्या.सं. मधील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा तसेच रामनगर पो.स्टे. अ.क्र. ३६५/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या. सं. मधील मोटारसायकल क्र. MH ३४ BU २५३३ हिची चोरी तसेच बल्लारशहा येथील जबरी चोरी व चंद्रपूर शहर पो.स्टे. हद्दतील दोन मोबाईल हिसकावून केलेल्या जबरी चो-या ह्या रेकॉर्डवरील आरोपी (१) अशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख, वय २१ वर्षे रा. फुकटनगर, चंद्रपूर व (२) अमित रतन गाईन, वय १९ वर्षे, रा. रामनगर, भगतसिंग चौक, चंद्रपूर यांनी केले आहेत. त्यानुसार त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे मागावर असताना ते वरोरा नाका येथील पुलाखाली असल्याची माहिती मिळाल्याने तेथे पथकासह जाऊन छापा घालून त्यांचे कब्जातून वरील घरफोडीतील चोरीस गेलेला माल, चोरलेली मोटारसायकल व तीन जबरी चोरोतील मोबाईल असा ७२,२००/- रूपये किंमतीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. या संदर्भात (१) पोलीस स्टेशन रामनगर अप. क्र. ३६८/२०२५ कलम ३३१(३) ३३१ (४) ३०५ भा.न्या.सं. , (२) पोलीस स्टेशन रामनगर अप.क्र. ३६५/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या. सं., (३) पोलीस स्टेशन बल्लारशहा अप. क्र. ३२१/२०२५ कलम ३०९ (४) भा.न्या. सं., (४) पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अप. क्र. ३३०/२०२५ कलम ३०३ (२) भा. न्या. सं., (५) पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अप. क्र. ३३१/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या. सं. अशी गुन्हे दाखल असून ते उघडकीस आले आहे. आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्याची तजवीज ठेवली आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक  मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, सचिन गुरनुले, मनिषा मोरे, रविकुमार ढंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!