मंगेश पोटवार यांचेवर अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल
मंगेश पोटवार यांचेवर अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल
मूल येथील सामाजीक व राजकीय कार्यकर्ते मंगेश पोटवार यांचे विरोधात मूल पोलिसांनी काल अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सुजीत गुलचंद खोब्रागडे यांचे तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
एका माजी नगरसेवक व पाच—सहा लोक मिळून आपले विरोधात अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तयारी करीत असल्याची फेसबुकवर पोटवार यांनी पोस्ट केल्यांने या प्रकरणाची गुंतागुत वाढली ओ.
सुजीत खोब्रागडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगेश पोटवार हे पत्रकार म्हणून आपल्याला वारंवार जाहीरातीसाठी त्रास देतात. पोटवार यांनी टेकाडी येथे बोअरवेलचे कामात गैरव्यवहार केल्यांने, आपण त्या कामाची माहीती मागण्याकरीता आरटीआय दाखल केल्यामुळे ते माझेवर चिडून होते. माझे टुरिस्ट वाहन नागपूर रोडवरील गॅरेजमध्ये दुरूस्ती करण्याकरीता मी गेलो असता, तेथे मंगेश पोटवार यांनी मला अश्लिल, जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार खोब्रागडे दिनांक 8 मे रोजी मूल पोलिसांना दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मंगेश पोटवार हे मूल तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजीत पवार गट) चे तालुका अध्यक्ष असल्यांने या प्रकरणात राजकीय हेतू आहे काय? यावर चर्चा सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!