शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन
वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेचा निकाल१००%, तर कला शाखेचा निकाल ८२.७५,% लागला असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विद्यालय विज्ञान शाखेचा निकाल १००% असून कला शाखेचा निकाल ८२.७५% लागला आहे . विज्ञान शाखेत ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दरवर्षी १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. तर कला शाखेत ५८ विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर संचालिका भावना तर्वेकर सचिव विनोद मेंढे, संचालिका सीमा मेंढे प्राचार्य पराग टेंभेकर,उपप्राचार्य अजय ठवरे, पर्यवेक्षक प्रमोद मेश्राम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!