वाघाच्या हल्यात दोन दिवसात तीन बैल ठार - वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी
सावली - अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतीचे नुकसान झालेले आहे व त्यातच वाघ पाळीव जनावरांवर हल्ले करून ठार मारत असल्याने जानकापूर परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सावली तालुक्यातील जनकापूर रिठ या गावाभोवताल जंगल आहे. जंगलाच्या बाजूने शेतशिवारात जनावरे चरत असतांना वाघाने रवींद्र गुरनुले, मुखरू गेडाम, एकनाथ सोनकर या शेतकऱ्यांच्या बैलावर हल्ला करीत ठार केले. शेती हंगाम सुरु होण्याकरिता काही दिवस शिल्लक असल्याने, शेतकऱ्यांच्या शेती हंगाम करण्याकरिता बैल नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वाघ जनावरांवर हल्ला करीत मनुष्याचे जीव घेण्याची जास्त शक्यता असल्याने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांनी वनविभागाकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!