धम्मंजली महिला मंडळ तर्फे बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती विचार मंच येथे संपन्न
शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )
चिमूर : - इंदिरा नगर चिमूर येथे धम्मंजली महिला मंडळ यांच्या वतीने दिनांक.१२/०५/२०२५ ला बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती विचार मंच येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रच्या निमित्ताने महाप्रसाद व खिरदान करण्यात आले. या कार्यक्रमा निमित्त प्रमुख पाहुण्यांनी योग्य मार्गदर्शन केले.कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुण्यांचं स्वागत स्वागत गिताने करण्यात आले.उपस्थित प्रवक्ते एडव्होकेट संजीवनी सातारडे मॅडम तसेच ताई हरी मेश्राम शिक्षिका उपासिका कल्पना गायकवाड अध्यक्ष स्थानी संतोषजी भैसारे सामाजिक कार्यकर्ता किशोरजी अंबादे,विलास इंदूरकर तसेच अखिल भारतीय तक्षशिला बौद्ध विहार चे सदस्यागन व शहरातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.रसिका अरुण लोखंडे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!