स्थानिकांना रोजगार द्या; ट्रक चालकांना पुन्हा सेवेत घ्या – युवासेनेची आरो माइनिंगला मागणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - भद्रावती तालुक्यातील स्थानिकांना रोजगार न मिळणे आणि ट्रक चालकांना कामावरून कमी करण्याचा निर्णय अन्यायकारक असून तत्काळ योग्य तो निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा थेट इशारा आलेख रमेश रट्टे यांच्या नेतृत्वात युवासेना भद्रावती-वरोराच्या वतीने आरो माइनिंग व्यवस्थापनाला देण्यात आला. या मागणीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले.भद्रावती तालुक्यातील तरुणांना कंपनीत रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि जे कामगार आधीच कार्यरत आहेत त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी ही स्थानिकांची प्रमुख मागणी आहे. तर मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आलेख रमेश रट्टे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. आरो माइनिंगमध्ये काम करत असलेल्या काही ट्रक चालकांना अचानक सेवेतून कमी करण्यात आले. हा प्रकार पूर्णपणे अन्यायकारक असून त्यांना त्वरित पुनर नियुक्ती द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.हे निवेदन देतांना विधानसभा समन्वयक मुनेश्वर बदखल, अमोल पारोदे, वेदांत गजबंदे यांची उपस्थिती होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले असले तरी मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.
संघर्षाशिवाय न्याय नाही – आलेख रमेश रट्टे
यावेळी बोलताना आलेख रमेश रट्टे म्हणाले, "स्थानिक तरुणांना रोजगार द्यायला हवा, त्यांचा हक्क हिरावला जाणार नाही! जर कंपनीने योग्य निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. आम्ही शांत बसणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!