वैजेश्वर घाटावर घाणीचे साम्राज्य

मृतदेहांच्या आत्म्यास शांती मिळेल कशी..?

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - विदर्भाची काशी म्हणून पवनी शहराची ओळख आहे.आणि वैनगंगा नदीपात्रावरील घाट हे प्राचीन वारसांसह संपन्न असून शहरातील वैजेश्वर घाटावर धार्मिकदृष्ट्या पाहता अंत्यविधी करीता अनेक मृतदेह, दशक्रिया पूजेसारख्या विधी दैनंदिनी केल्या जातात. परंतु पवित्र्यप्राप्त वैजेश्वर घाटावर अंत्यविधी करता आवश्यक सोयी सुविधा मात्र चोरी गेल्या गत चित्र दिसून येतात. पवनी हे शहर अति प्राचीन असून या शहरात हिंदू स्मशानभूमी करिता जागाच नाही,पारंपारिक स्मशान घाटावर प्राथमिक सुविधा नाही,येणाऱ्या दोन महिन्यानंतर वाहून जाणाऱ्या साडे - बारा लाखाच्या शेडमध्ये बसण्या जोगी सु-व्यवस्था नाही शेड मधील घान व दैनंदिन सांडपाण्याचा झरा वाहतोय घाटावर घाणीचे पूर्णतः साम्राज्य पसरलेले आहेत.या शोक मंडपातून ज्या आत्म्याबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या जातात ती आत्मा या घाणीत कशी शांत होईल असा प्रश्न शोक-सभा मंडपात उभे असणाऱ्यांना नक्कीच पडत असावा अशी परिस्थिती घाटावर पहावयास मिळते. गेल्या तीन वर्षात विकास कामाचा वैनगंगेला मोठा पूर आला होता. मात्र आता पुर उसरल्यानंतर घाट मात्र सुखा तो सुखाच राहिला. वैजेश्वर घाटावर अंत्यविधी करिता सुविधा आणि दफनविधी करिता हिंदू स्मशानभूमीची सुविधा व्हावी याकरिता विदर्भ युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष हर्षल वाघमारे यांनी मागणी केलेली आहे.तसेच जनतेकडून होत असलेली ही मागणी रास्त असून लवकरात लवकर पूर्ण होणे सुद्धा गरजेचे आहे.म्हणून मुख्याधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!