सोहम गिरीची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड
पवनीच्या सुपुत्राची उंच भरारी
राष्ट्रीय आष्टेडू आखाडा स्पर्धेकरिता निवड
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.०६/०३/२०२५ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा,भंडारा जिल्हा आष्टेडू आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन मर्दानी खेळ राज्यस्तरीय शालेय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धा - २०२४-०२५ गांधी भवन पवनी येथे ४ आणि ५ मार्चला पार पडल्या.या स्पर्धेत बालाजी विद्यानिकेतन पब्लिक स्कूल पवनी येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी सोहम अशोक गिरी याने १४ वर्षे वयोगटामध्ये सर्व सामने जिंकत प्रथम क्रमांक प्राप्त केला व त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेकरीता झालेली आहे.सोहम आणि त्याचे मार्गदर्शक शिक्षक गौरव माकडे यांचे संत चोखामेळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,सचिव, सर्व संचालक आणि बालाजी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!