अतिवृष्टीमुळे घर पडझडीतील डावललेल्या लोकांची पून्हा चौकशी करून तात्कालिन तलाठी यांच्यावर कारवाई करा
अतिवृष्टीमुळे घर पडझडीतील डावललेल्या लोकांची पून्हा चौकशी करून तात्कालिन तलाठी यांच्यावर कारवाई करा
यश कायरकर, तालुका प्रतिनिधी:
नागभीड तालुक्यातील एकदम शेवटच्या टोकावर असलेले साजा क्रमांक ३० जिवनापूर येथील दि. २४/०७/२०२४ रोजी वादळ व पावसामुळे झालेल्या घरांची पडझड नुकसान झाले, यात गत पावसाळ्यात वादळ व पावसामुळे काही घरे कोलमडली. मात्र त्या संदर्भात अहवाल तयार करताना संबंधित अधिकाऱ्यांनी यादीमध्ये बदल करून नुकसानग्रस्तांचा लाभ डावलून इतरांनाच अधिक लाभ पोहोचविला असे आरोप करत, संबंधित तलाठी व अधिकाऱ्यांवर रीतसर कारवाई करावी व मुख्य नुकसानग्रस्तांनाच लाभ मिळवून द्यावा. असे गावातील सामाजिक कार्यकर्ते रामदिन नान्हे यांनी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन सादर केले.
*अतिवृष्टीमुळे घर पडझड पंचनामे बोगस*
*माहिती अधिकारात माहिती प्राप्त.*
या अनुषंगाने संदर्भित माहिती अधिकार तहसिलदार नागभिड यांच्या कडुन घेतला असता व तहसील कार्यालय द्वारे प्राप्त माहिती व दिनांक २४/०७/२०२४ चे पिडीत ग्रामस्थांची माहिती पडताळणी केली असता स्थानिक मोका चौकशी करणाऱ्या साजा क्र. ३० मौजा जिवनापुर येथील तलाठी श्री. ए. के. चव्हाण यांनी गरजु व खऱ्या लाभार्थ्यांना कमी अनुदान मंजूर केले व बोगस लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मंजुर केले. आणि चौकशी अधिकाऱ्यांनी त्याला मुक संमती दिली. संबंधीत पंचासमक्षचे पंचनाम्यावर डुप्लीकेट स्वाक्षरी असल्याचे दिसुन येत आहे. तेव्हा तलाठी श्री. ऐ.के. चव्हान व चौकशी अधिकारी यांनी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुण शासनाची दिशाभूल व पिडीत ग्रामस्थांची फसवणुक केलेली आहे असे दिसून येते.
*तलाठी अधिकार्यावर कार्यवाही ची मागणी.*
यामुळे सबंधित बाबतीत आर्थिक देवाण-घेवाणीची शक्यता नाकारता येत नाही. तर बोगस कामे करणारे तलाठी श्री. ए.के. चव्हाण व चौकशी अधिकारी आणि संबंधित प्रकरणाशी व संबंधीत आपतग्रस्त यांची पुनरचौकशी करूण तलाठी ऐ.के. चव्हान व चौकशी अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आणि खऱ्या व गरजु लाभार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवुन देण्यात यावा. असी मागणी चे निवेदन रामदिन नान्हे यांनी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांना दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!