शास.आय.टी.आय च्या रासेयो श्रमसंस्कार शिबिराचा समारोप: विद्यार्थ्यांनी स्वतः मधील गुण ओळखून ध्येय निश्चित करावे - प्राचार्य वानखेडे
शास.आय.टी.आय च्या रासेयो श्रमसंस्कार शिबिराचा समारोप: विद्यार्थ्यांनी स्वतः मधील गुण ओळखून ध्येय निश्चित करावे - प्राचार्य वानखेडे
चंद्रपूर (प्रतिनिधी)-
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर संस्थेच्या परिसरात संपन्न झाले . या शिबिराचा समारोप संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. इमाव व बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, मुख्य कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर, गटनिदेशक जितेंद्र टोगे, एन. एन. गेडकर, सुचिता झाडे, पी. आर. बोकडे, सौ. निमसरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रथमत: शिबिराचा लेखाजोखा कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी प्रस्तुत केला. यावेळी विजय वाकुलकर म्हणाले, नॉट मी बट यु हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य आहे. त्याची सुरुवात स्वतःपासून सुरू केल्यास देशातील अनेक समस्या मार्गी लागतील. कौशल्यरूपी शिक्षणाची कास धरली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रसंतांच्या विचारानुसार युवकांनी गावाशी नाते जोडावे आणि आपल्या तंत्रज्ञानाचा फायदा ग्रामीणांच्या उत्थानासाठी करावा , असे डॉ. अनिल चिताडे म्हणाले. प्राचार्य वानखेडे यांनी शिबिर उत्तमपणे पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः मधील गुण ओळखून ध्येय निश्चित करावे, असे आवाहन केले. यावेळी बेस्ट कोआर्डीनेटर पुरस्कार एलिना गायकवाड, मारोती टेकाम, हर्षल कळसकर, मारिया उराडे तर माजी रासेयो स्वयंसेवक रिया पिपरीकर इ. ना अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन पियुष केने यांनी केले तर आभार प्रदर्शन एन.टी. गराड यांनी केले केले. कार्यक्रमास सर्व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात स्वच्छता अभियान व श्रमदानावर विशेष भर दिला तर प्लंबिंग, सुतारकाम, इलेक्ट्रिकल, गवंडी, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स संबंधित मेंटेनन्स अभियानास सुरूवात झाली.
गुरूवारच्या कौशल्य विकास संबंधित दुसऱ्या सत्रात गटनिदेशक जितेंद्र टोगे यांच्या अध्यक्षतेखाली आयटीआय नंतरच्या संधी यावर गटनिदेशक एन.एन. गेडकर यांनी तसेच उद्योजकता विषयावर गटनिदेशक एच. जे. नंदेश्वर यांनी विचार मांडले.
शुक्रवारच्या पहिल्या सत्रात वाहतूक सुरक्षितता आणि युवकांची जबाबदारी या विषयावर वाहतूक विभागाचे एपीआय श्री. सोनोणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वाहतुकीच्या नियमावर प्रकाश टाकला. संस्था परिसर स्वच्छता अभियान, मेंटेनन्स अभियान तसेच संस्था विकास कार्यात सर्व समितीच्या सदस्यांनी योगदान दिले. सांस्कृतिक कार्यक्रम व सहभोजनाने शिबिराचा समारोप करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!