अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई... तहसीलदार राजेश भांडारकर ॲक्शन मोडवर..

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई...

 तहसीलदार राजेश भांडारकर ॲक्शन मोडवर...

वरोरा/ भद्रावती..जगदीश पेंदाम

 अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने कारवाई करीत ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली   शनिवारला रात्रीच्या सुमारास   भद्रावती तालुक्यातील किनारा नाल्यातून अवैध रेती वाहतूक कोकेवाडा धानोली शेत शिवार रस्त्यावर  ट्रॅक्टर क्र, एम एच 29 टी सी 4175 किनारा, कोकेवाडा,धानोली घाटावरून अवैध रेती भरून येत असल्याची गोपनीय माहिती गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी कोकेवाडा गावाजवळ ट्रॅक्टरला पकडून कारवाई केली आहे   अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल सदर ट्रॅक्टर धानोली येथील असल्याचे सांगण्यात आले ही कारवाई भद्रावती येथील तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथक तलाठी गोविंदा सेलोटे, तलाठी खुशाल मस्के,मंडळ अधिकारी अनिल दडमल ,निर्दोष फुल बोगे, नितीन बुचुंडे कोतवाल यांनी केली....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!