चांदली बुज. येथे पोलीस पाटीलच्या घरात चोरी - फरार अट्टल चोरट्यास पकडण्याचे पोलिसांपुढे आवाहन
सावली - चांदली बुज. येथील पोलीस पाटील चिंतामण बालमवार यांच्या घरी चोरी करतांना करण मर्लावार हा आरोपी रंगेहात पकडला गेला मात्र झटका देत पसार झाला. सावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहे.
सावली तालुक्यातील चांदली बुज. येथे मध्यरात्री (३० एप्रिल) रोजी पोलीस पाटील चिंतामण बालमवार हे कुटुंबासह एका खोलीत झोपेत असतांना आरोपी करण बुधा मर्लावार या व्यक्तीने घरात प्रवेश केला. कुणीतरी घरात असल्याची चाहूल लागल्याने बालमवार जागे झाले. त्यावेळी आरोपी पळ काढत असतांना दिसला. त्याचा पाठलाग करून पकडले मात्र झटका देत पसार झाला. घरात चौकशी केली असता आलमारी फोडली व त्यातील १० हजार रुपये लंपास केल्याचे दिसलें. यावेळी बाजूला जागेश्वर मिडपलवार यांचेही घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे दिसलें. त्यांचेही घरातील ६ तोळे चांदी चोरीस गेल्याचे आढळून आले. बालमवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून करण मर्लावार याचेवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ६२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीला दोन वर्षांपूर्वी गडचिरोली येथे चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यामुळे सदर आरोपी हा अट्टल चोर असल्याची चर्चा असून सावली पोलिसांनी शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!